सरिता देवी व्यावसायिक होणार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - भारताची माजी जगज्जेती आणि आशियाई सुवर्णपदक विजेती बॉक्‍सर एल. सरितादेवी हिने आता व्यावसायिक बॉक्‍सर होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने परवानगी दिल्यास ती हौशी खेळाडू म्हणूनही खेळण्यास उत्सुक आहे. सरिताने नुकताच देशातील व्यावसायिक बॉक्‍सिंगखेळाडूंसाठी असलेल्या एका कंपनीसाठी दोन वर्षांचा करार केला. सरिता म्हणाली, ""आतापर्यंत भारताकडून खूप स्पर्धेत खेळले. ऑलिंपिकखेरीज ज्या स्पर्धेत खेळले, त्या प्रत्येक स्पर्धेत पदक मिळविले. आता काहीतरी वेगळे करण्याचा विचार आला. त्यामुळे व्यावसायिक स्तरावर पदार्पण करण्याचे निश्‍चित केले.'' 

Web Title: Sarita Devi will be professional