दुखापत होऊनही सार्थकचे विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - पुण्याच्या सार्थक चव्हाणने पायाला दुखापतीमुळे बॅंडेज बांधलेले असतानाही कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. 

पुणे - पुण्याच्या सार्थक चव्हाणने पायाला दुखापतीमुळे बॅंडेज बांधलेले असतानाही कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. 

बेळगावमध्ये रविवारी ही स्पर्धा पार पडली. ‘ज्युनियर ३’ (७ ते १२ वर्षे) गटात त्याने पहिला क्रमांक मिळविला, तर ‘ज्युनियर २’ (१२ ते १५ गट) गटात दुसरा क्रमांक मिळविला. सार्थक दहा वर्षांचा आहे. त्याचे वडील व प्रशिक्षक श्रीकांत यांनी सांगितले, की दहा दिवसांपूर्वी साताऱ्यात सराव करताना डबल जम्प घेताना सार्थक पडला. त्याच्या उजव्या पायाची तीन बोटे फ्रॅक्‍चर झाली होती. बॅंडेज चार आठवडे घालण्याची गरज होती. दुखापत झालेल्या पायाने ब्रेक मारायचा नसल्यामुळे डॉक्‍टरांनी काळजी घेण्याचा सल्ला देत स्पर्धेसाठी परवागनी दिली. सार्थकने डाव्या पायात नेहमीचा चार नंबरचा, तर फ्रॅक्‍चरमुळे उजव्या पायात दहा नंबरचा बूट घातला. त्याने दोन्ही गटांत कावासाकी केएक्‍स ६५ ही बाईक चालविली. शर्यत पूर्ण करायची आणि स्पर्धात्मक अनुभव घ्यायचा हाच माफक उद्देश होता; मात्र शर्यत सुरू झाल्यानंतर त्याने जिद्दीने रायडिंग करत सहा रायडरमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.’ सार्थक रोझरी कॅम्पमध्ये सहावीत शिकतो. ‘ज्युनियर २’ गटात युवराज कोंडेदेशमुख जिंकला.

Web Title: Sarthak title win