थायलंड ओपन टे. टे. भारताच्या साथियन-शेट्टी जोडीला दुहेरीत रौप्यपदक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

भारताच्या जी. साथियन आणि सनील शेट्टी यांना थायलंड ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
 

नवी दिल्ली - भारताच्या जी. साथियन आणि सनील शेट्टी यांना थायलंड ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

साथियन-शेट्टी जोडीने प्रथम जपानच्या जोडीचा 3-1, नंतर मलेशियाचा 3-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली होती. उपांत्य फेरीत त्यांनी भारताच्याच हरमीत देसाई-मानव ठक्कर जोडीचा 3-2 असा पराभव केला. 

अंतिम लढतीत भारतीय जोडीला जर्मनीच्या तोबिआस हिपलर-किलन ओर्ट जोडीचे आव्हान पेलवले नाही. पहिला गेम जिंकल्यानंतरही भारतीय जोडीला 11-9, 12-14, 9-11, 7-11 असा पराभव पत्करावा लागला. 

Web Title: Sathiyan-Shetty win silver in Thailand Open TT