गौतमला वगळण्याबाबत व्यवस्थापन ‘गंभीर’

सुनंदन लेले
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

दुसऱ्या कसोटीसाठी राहुलला दाखल होण्याचे आदेश
विशाखापट्टणम - न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिलीच कसोटी वाचवण्यासाठी धडपड करावी लागल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनास नियोजन बदलणे भाग पडले. प्रथम कोहलीचा संताप झाल्यावर खेळपट्टीवरील गवत काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी गौतम गंभीरचे अपयश लक्षात घेता त्यांनी रणजी सामन्यात खेळत असलेल्या लोकेश राहुलला तातडीने संघात दाखल होण्याचे आदेश दिले.

राहुलची निवड ही संघातील अतिरिक्त खेळाडू म्हणून करण्यात आली. एकूणच दुसऱ्या कसोटीसाठी गंभीरला वगळण्याचे संकेत संघ व्यवस्थापनाने दिले. 

राजकोटच्या खेळपट्टीवर गवत ठेवल्याचे पाहून आश्‍चर्यचकित झालेला कर्णधार विराट कोहलीने आपला संताप व्यक्त केला होता. अर्थात, तो याबाबत थेट बोलला नाही. पण, त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि विशाखापट्टणम खेळपट्टीवरील गवत कापण्याचे आदेश देण्यात आले.  कमी गवत आणि त्यामानाने कमी पाणी खेळपट्टीवर मारले गेले, तर दुसऱ्या दिवशीपासून खेळपट्टी फिरकीला साथ देऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ येथे दाखल झाले आहे. पाच दिवसांचे खडतर क्रिकेट आणि प्रवास करून  थकल्यानंतरही सरावाला जास्त करून राखीव खेळाडू आणि फॉर्मशी झगडत असलेले भारतीय फलंदाजांनी प्राधान्य दिल्याचे जाणवले. गौतम गंभीरने पुनरागमनाच्या संधीचे सोने केले नसल्याने के एल राहुलला भारतीय संघात तातडीने समावेश करण्यात आला आहे.

Web Title: second test cricket match