नदालचा क्रश समुद्र अन् 80 फूट यॉट; पाहून थक्कच व्हाल!

मुकुंद पोतदार
शुक्रवार, 26 जुलै 2019

स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदालचा जन्म मॅनाकोरमध्ये झाला. मयोर्का बेटावरील हे एक शहर आहे. हे बेट बॅलेरीक बेटांचा भाग आहे. नदाल आता लवकरच 80 सनरीफ पॉवर ही अलिशान यॉट खरेदी करणार आहे. पोलंडच्या सनरीफ यॉट्स कंपनीने ती बनविली आहे

 

स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदालचा जन्म मॅनाकोरमध्ये झाला. मयोर्का बेटावरील हे एक शहर आहे. हे बेट बॅलेरीक बेटांचा भाग आहे. नदाल आता लवकरच 80 सनरीफ पॉवर ही अलिशान यॉट खरेदी करणार आहे. पोलंडच्या सनरीफ यॉट्स कंपनीने ती बनविली आहे. या कंपनीचे मालक फ्रान्सिस लॅप गतवर्षी फ्रान्समधील केन्स येथील यॉटींग फेस्टीवलमध्ये नदालला भेटले. ही यॉट यंदाच्या फेस्टीवलमध्ये सादर केली जाईल. नदालची यॉट संपूर्णपणे त्याच्या पसंतीनुसार बनविण्यात येईल. पुढील वर्षी त्याला डिलीव्हरी मिळण्याची अपेक्षा आहे.

या यॉटवर जाण्यासाठी वापरली जाणारी बोट, जेटस्की, वॉटर टॉईज ठेवता येईल इतके मोठे गॅरेज आहे. यॉटवर 12 व्यक्ती आणि चार क्र्यु मेंबर्स राहू शकतात. 

मला एकांत हवा असेल तर तो बेथोवीन यॉटवर मिळतो. मला लोकांबरोबर राहायला आवडते, पण त्याचवेळी एकांत हवा असेल किंवा मला ज्यांचा सहवास हवा आहे असेच लोक बरोबर हवे असतील तर मी यॉटवर जातो. माझ्या आजच्या जीवनशैलीबाबत ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. मला समुद्र आवडतो. मी समुद्रावर आयुष्य काढू शकतो. त्यामुळे भविष्यात मी बराच वेळ यॉटवर व्यतीत करेन. एक जीवनशैली म्हणून मला यॉटींग आवडते आणि माझे यावर प्रेम आहे.
- रॅफेल नदाल

नदालकडे एमसीवाय 76 ही यॉट असून ती त्याने 30 लाख डॉलरला विकायला काढली आहे. माँटे कार्लो यॉट 76ची बांधणी बेनेटेयू या फ्रेंट कंपनीने इटलीमधील माँटेफाल्कोनमध्ये केली. नदालने 23.5 मीटर लांबीच्या या स्टायलीश यॉटला बीथोवेन असे नाव दिले. नदालला क्लासीकल म्युझीक आवडते. तो वेळ मिळेल तसे सिंफनी कॉन्सर्टला जातो. 2016 मध्ये नदालने ही यॉट खरेदी केली.

Image may contain: ocean, outdoor and water

नुवोलारी लेनार्ड या इटलीच्या टीमने या यॉटचे डिझाईन तयार केले. कार्लो नुवोलारी आणि डेन लेनार्ड हे जगप्रसिद्ध यॉट डिझायनर आहेत. यॉटवर चार बेडरुम्स आहेत. आठ व्यक्ती आणि दोन क्र्यू या यॉटवर राहू शकतात. ही यॉट ताशी 31 नॉट्स वेग राखू शकते. लक्झरी यॉट असल्यामुळे 26 नॉट््सची मर्यादा ठेवली जाते.

Image may contain: people sitting, living room, table and indoor

नदाल बहुतांश वेळा मित्रांनाच घेऊन यॉटवर जातो. यॉटवर सनबाथ घेण्याची त्याला आवड आहे. व्यावसायिक टेनिसपटू म्हणून नदाल कायम कुल राहिला आहे. त्याचे रहस्य समुद्र आणि यॉट यांत दडले आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

Image may contain: indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See Rafael Nadal Just Bought a Custom 80-Foot Luxury Yacht