World Cup 2019 : निवृत्तीवर धोनी अखेर बोललाच

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या सुरु असलेल्या विश्वकरंडकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. यावर खुद्द धोनीनेच मोठे विधान केले आहे. एबीपी न्यूजशी बोलताना त्याने तो कधी निवृत्त होईन हे त्यालाही माहीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या सुरु असलेल्या विश्वकरंडकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. यावर खुद्द धोनीनेच मोठे विधान केले आहे. एबीपी न्यूजशी बोलताना त्याने तो कधी निवृत्त होईन हे त्यालाही माहीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

तो म्हणाला,''मी कधी निवृत्त होईन, याची मलाही आता कल्पना नाही. मात्र, श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मी निवृत्त व्हावे अशा अनेकांची इच्छा आहे,'' असे म्हणत त्याने संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. 

विश्वकरंडकानंतर धोनी निवृत्त होणार अशा बातमी काही दिवसांपूर्वी पीटीआयने दिली होती. ''धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या विश्वकरंडकामध्ये त्याचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. तसेच, त्याच्यावर चोहोबाजूंनी टीकाही होताना पाहायला मिळत असून तो निवृत्ती जाहीर करू शकतो,'' अशा माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. 

तसेच तो सध्या प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या बॅट वापरुन त्याच्या प्रायोजकांचे आभार मानत आहे. तसेच आयसीसीनेही त्याला मानवंदना देण्यासाठी एक खास व्हिडिओ तयार केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See what MS Dhoni has to say on his retirement