आयर्लंड दौऱ्यावर निवडसमिती अध्यक्षांची करडी नजर; जातीनं हजर राहणार

Selection Committee Chairmen Chetan Sharma Will accompany Team India In Ireland Tour
Selection Committee Chairmen Chetan Sharma Will accompany Team India In Ireland Tour esakal

राजकोट : भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या टीम इंडियाच्या निवडसमितीचे अध्यक्षपद भुषवणारे चेतन शर्मा संघासोबत आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. आर्यलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार असून या दौऱ्यावर भारत दोन टी 20 सामने खेळणार आहे. याचबरोबर या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहणार आहेत. भारत 26 आणि 28 जूनला डब्लिन येथे दोन टी 20 सामने खेळणार आहे. (Selection Committee Chairmen Chetan Sharma Will accompany Team India In Ireland Tour)

Selection Committee Chairmen Chetan Sharma Will accompany Team India In Ireland Tour
इंग्लडने नेदरलंडचा संहार केला आणि तिकडे जाफरने मॉर्गनला ट्रोल केलं

चेतन शर्मा अध्यक्ष असलेल्या निवडसमितीचे सदस्य भारताचे माजी डावखुरे फिरकीपटू सुनिल जोशी हे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेदरम्यान टीम इंडियासोबत आहेत. या मालिकेत भारताने पहिले दोन सामने गमवाले होते. भारत मालिका हरण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने खेळ उंचावला. तिसरा सामना 48 धावांनी तर चौथा सामना तब्बल 82 धावांनी जिंकला. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा निर्णायक सामना बुंगळुरू येथे रविवारी होणार आहे. हा सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे.

Selection Committee Chairmen Chetan Sharma Will accompany Team India In Ireland Tour
'अभी खेलने का नही *** का...' कार्तिकच्या खेळीवर सेहवागचे ट्विट व्हायरल

दरम्यान, भारताचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी रवना झाला असून या संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, रविंद्र जडेजा, शुभमन गिल हे प्रमुख खेळाडू आहेत. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यावर भारताच्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.

केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र त्याला इंग्लंड दौऱ्यावरील कोसटी सामना खेळायचा असल्याने त्याचवेळी होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. आयर्लंड बरोबरच भारतीय संघ इंग्लंडमध्ये देखील तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com