Boxing Championship : अनंता व अल्फिया भारतीय वरिष्ठ बॉक्सिंग संघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boxing Championship

Boxing Championship : अनंता व अल्फिया भारतीय वरिष्ठ बॉक्सिंग संघात

अकोला : जॉर्डन (अमन) येथे ता. ३० ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान होऊ घातलेल्या सिनियर एशीयन चॅम्पियनशीप स्पर्धेत स्थानिक वसंत देसाई क्रीडांगणावर बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेणारे अनंता चोपडे व अल्फिया पठान भारतीय वरिष्ठ बॉक्सिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गत ३० वर्षानंतर महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंना, अशा मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.

राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात वसंत देसाई क्रीडांगणातील बॉक्सिंग केंद्रात बॉक्सिंगचे धडे घेणारा अकोला क्रीडा प्रबोधिनीचे अनंता चोपडे ५४ किलो वजन गटात प्रतिस्पर्धी विदेशी खेळाडूवर वर्चस्व मिळवुन भारतीय संघाला सुवर्ण जिंकूण देण्याच्या इऱ्याद्याने रिंगमध्ये उतरणार आहे. याआधी अनंताने एलरोडा कप, थायलंड ओपन, बिजिंग ऑलंम्पिक चाचणी प्रतियोगिता, ड्युल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर सुवर्ण पदक जिंकूण दिले.

त्याप्रमाणे अल्फिया पठान ८१ किलो वजन गटात महिला भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अल्फियानेही अनेक स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदक जिंकले आहेत.

खेळाडूंचे होत आहे अभिनंदन

क्रीडा प्रबोधिनीच्या दोन बॉक्सरांची निवड भारतीय वरिष्ठ संघात झाल्याने त्यांचे क्रीडा विभागाचे डायरेक्टर श्री. कामळे, क्रीडापीठ प्रमुख सुहास पाटील, उपसंचालक श्री.चौरमुले, अमरावती विभागाचे उपसंचालक विजय संतान, सुधीर मोरे, शेखर पाटील, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे रंजीत सावरकर, राजेश तिवारी यांच्यासह अकोला क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

पलक व रेवतीची विजयी घौडदोड कायम

मणीपूर येथे होत असलेल्या ज्युनियर (मुली) राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना स्थानिक वसंत देसाई क्रीडांगणतील क्रीडा प्रबोधिनीच्या रेवती उंबरकर व पलक झामरे यांनी मुंबई येथील विजयाची लय कायम ठेवत आपापल्या वजन गटात विजय मिळवून पुढील स्पर्धेत प्रवेश मिळवला.

मणीपूर इम्फाल येथील खुमान स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बॉक्सिंग रिंगवर ता. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून ४८ किलो वजन गटात आशीयन रजत पदक विजेती पलक झामरे हिने दिल्लीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळवला.

तसेच मुंबई येथील स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती रेवती उंबरकरने ४४-४६ किलो वजन गटात खेळताना पंजाबच्या बॉक्सरचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. दोन्हीही बॉक्सर खेळाडूंनी राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगचे धडे घेतले आहेत. स्पर्धेत सुवर्ण पटकवल्यास भारतीय ज्युनियर संघात आपली दावेदारी पक्की करणार आहेत.

टॅग्स :AkolasportsBoxing