सेरेनाला मानांकन नाकारल्यामुळे वाद 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला फ्रेंच ओपन संयोजकांनी खास बाब म्हणून मानांकन नाकारल्यामुळे या धोरणाविषयी पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मुलीच्या जन्माच्या वेळी सेरेनाची प्रकृती ढासळली होती. 36 वर्षीय सेरेनाची जागतिक क्रमवारीत 449व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

पॅरिस - अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला फ्रेंच ओपन संयोजकांनी खास बाब म्हणून मानांकन नाकारल्यामुळे या धोरणाविषयी पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मुलीच्या जन्माच्या वेळी सेरेनाची प्रकृती ढासळली होती. 36 वर्षीय सेरेनाची जागतिक क्रमवारीत 449व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पूर्वीच्या क्रमांकानुसार आठ स्पर्धांत भाग घेण्याची परवानगी असल्यामुळे सेरेनाने या स्पर्धेत भाग घेतला. तिचे ग्रॅंड स्लॅम पुनरागमन मात्र मानांकनाअभावी सोपे नसेल. तिला पहिल्या काही फेऱ्यांतच मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळावे लागेल. "यूएसए टुडे'ने संयोजकांच्या धोरणावर टीका केली. "आई बनल्याबद्दल फ्रेंच ओपन सेरेनाला शिक्षा करीत आहे' असा मथळाच देत या दैनिकाने म्हटले आहे की, सेरेनाला सूट मिळायला हवी होती. 

गेल्या वर्षी मारिया शारापोवाच्या बाबतीत संयोजकांनी परखड भूमिका घेतली होती. ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरलेल्या शारापोवाला त्यांनी वाईल्ड कार्ड नाकारले होते. शारापोवाने मात्र सेरेनाला पाठिंबा दर्शविला. या धोरणात बदल व्हायला हवा. तसे झाले तर चांगलो होईल, असे शारापोवाने म्हटले आहे. 

विंबल्डन स्पर्धेत मात्र सेरेनाला झुकते माप मिळू शकते, कारण ग्रास कोर्टवरील कौशल्य आणि कामगिरीचा निकष ऑल इंग्लंड क्‍लब लावते. 

Web Title: Serena’s French Open seed denial stirs fresh debate