Shafali Verma : 28 चेंडूत 76 धावा चोपणारी शफाली म्हणते, मला काही घाई नव्हती मात्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shafali Verma WPL 2023

Shafali Verma : 28 चेंडूत 76 धावा चोपणारी शफाली म्हणते, मला काही घाई नव्हती मात्र...

Shafali Verma WPL 2023 : अवघ्या 19 वर्षाच्या शफाली वर्माने Women's Premier League च्या पहिल्याच हंगामात सर्वांना हादरवून सोडले. नुकतेच भारताला 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या शेफाली वर्माने आज गुजरात जायंट्स विरूद्धच्या सामन्यात 28 चेंडूत नाबाद 76 धावा ठोकल्या. दिल्लीने गुजरातचे 106 धावांचे आव्हान 7.1 षटकात पार केले. यात शफालीचा वाटा 76 धावांचा तर मेग लेनिंगचा वाटा हा 21 धावांचा होता.

शफाली वर्माने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकत WPL 2023 च्या पहिल्याच हंगामातील दुसरी सर्वात वेगवान हाफ सेंचुरी मारली. या धडाकेबाज खेळीनंतर शफाली वर्माने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी शफाली म्हणाली की, 'मला सामना लवकर संपवण्याची काही घाई नव्हती. मात्र मी धावांचा पाठलाग करताना माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करत होते. आता आम्ही विश्रांती घेणार आणि मज्जा करणार. मी गेल्या सामन्यात फ्लिक करताना बाद झाले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात मी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मी याच्यावर लेनिंगच्या सल्ल्यानंतर काम केले. सल्ल्याबद्दल लेनिंगचे आभार.'

शफाली आपल्या भविष्याबद्दल म्हणली, 'मला भविष्यात धावा करण्यासाठी आणि अशाच अंदाजात खेळण्यासाठी खूप कष्ट करायचे आहेत. आम्ही संघासाठी आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहोत. यात आम्हाला यश देखील येत आहे. आम्ही धावांचा पाठलाग करताना स्वतःवर विश्वास दाखवला. आम्ही दोघी एकमेकींशी बोलत होते. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात.'

शफाली खेळपट्टीबद्दल म्हणाली की, ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी चांगली होती. ज्यावेळी गुजरात फलंदाजी करत होते त्यावेळी चेंडू चांगला स्कीड होत होता. आम्ही येणाऱ्या सगळ्या सामन्यात अशाच प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण