IPL 2019 : शाहरुख म्हणतोय, हा तर आंद्रेंद बाहुबली 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

आंद्रे रसेलने केलेल्या जबदस्त फटकेबाजीमुळे कोलकता नाईट रायजर्सने हातातून निसटलेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर खुश झालेला कोलकत्याचा सहमालक शाहरुख खानने त्याला बाहुबलीची उपमा दिली आहे.

आयपीएल 2019 : बंगळूर : रॉयल बंगळूरने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने केलेल्या जबदस्त फटकेबाजीमुळे कोलकता नाईट रायजर्सने हातातून निसटलेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर खुश झालेला कोलकत्याचा सहमालक शाहरुख खानने त्याला बाहुबलीची उपमा दिली आहे. 

बंगळूरने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या काही षटकांमध्ये रसेसने बंगळूरच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याने 13 चेंडूंमध्ये 48 धावांची खेळी केली. कोलकत्याला 18 चेंडूंमध्ये 53 धावांची गररज असताना त्याने सहा षटकार आणि एक चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. 

त्याच्या या कामगिरीचे कोतुक करताना शाहरुखने आंद्रे रसेलचा बाहुबलूच्या पोषाखातला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.त्यने संघातील प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले मात्र, या फोटोपुढे कौतुकाचे कोणतेही शब्द फिके पडतील असे ट्विट त्याने केले आहे. तसेच ''तुम्हाला कदाचित क्रिकेट कळत असेल पण तुम्हाला रसेल कधीच कळणार नाही. आता माझ्या मसलमॅनला वाईनची पार्टी द्यायची गरज आहे,'' असेही ट्विट त्याने केले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khan hails Andre Russell after his heroics against RCB in IPL 2019