आफ्रिदी करणार युवराजसिंगला आर्थिक मदत, कशासाठी?

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

युवराजने कॅन्सरवर मात करुन परतल्यावर कॅन्सग्रस्त लोकांसाठी 'YouWeCan' या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेला आफ्रिदीने दहा हजार डॉलरची मदत केली आहे. बुधवारी कॅनडामध्ये आयोजित कार्यक्रमात आफ्रिदीने ही घोषणा केली. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. मात्र, सध्या भारताचा माजी फलंदाजी युवराजसिंग आणि शाहिद आफ्रिदी यांच्या वेगळेच बाँडिंग पाहायला मिळत आहे. आफ्रिदीने युवराजच्या 'YouWeCan' या संस्थेला आर्थिक मदत केली आहे. 

युवराजने कॅन्सरवर मात करुन परतल्यावर कॅन्सग्रस्त लोकांसाठी 'YouWeCan' या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेला आफ्रिदीने दहा हजार डॉलरची मदत केली आहे. बुधवारी कॅनडामध्ये आयोजित कार्यक्रमात आफ्रिदीने ही घोषणा केली. 

युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो सध्या कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल टी20 लीगमध्ये सहभागी झाला आहे. त्याच्यासह या लीगमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रॅंडन मॅकलम, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हेही येथे विविध संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Afridi provides financial help to YouWeCan foundation