
Shahid Afridi : आयसीसी BCCI च्या ताटाखालचं मांजर; अफ्रिदी देखील झाला हतबल
Shahid Afridi Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट बोर्डात आशिया कप 2023 च्या आयोजनावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात भारत आणि पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू वक्तव्ये करत आहे. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने देखील याबाबत वक्तव्य केली आहेत.
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू म्हणाला, 'आयसीसीने आता या प्रकरणात लक्ष घ्यालावे. हे प्रकरण आता संपवले पाहिजे. बीसीसीआय या प्रकरणी काही करायच्या आत हे करायला हवं. भारत जर डोळे वटारत असेल, एवढी कडक भुमिका घेत असले तर त्यांनी ही भुमिका घेण्यासाठी स्वतःला तेवढं मजबूत केलं आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची भुमिका घेऊ शकतात. नाहीतर त्यांची हिंमत झाली नसती.'
अफ्रिदी समा टीव्हीशी बोलताना म्हणाला की, 'भारत आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार की नाही हे मला माहिती नाही. किंवा आपण भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार टाकणार की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो की आयसीसी देखील बीसीसीआय समोर काहीच करू शकत नाही. आता हा मुद्दा एसीसीच्या मार्चमधील बैठकीत उठवला जाईल.'
यापूर्वी अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही त्याच्या देशात जाणार नाही, तेव्हा ते म्हणतील की तेही आमच्या देशात येणार नाही. तसे, मला खात्री आहे की पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येईल. आशिया कप श्रीलंकेत हलवला जाऊ शकतो. षटकांचा विश्वचषक ही महत्त्वाची बाब आहे. दुबईमध्ये अनेक स्पर्धा झाल्या आहेत. आशिया कप श्रीलंकेला नेला तर मलाही आनंद होईल.'
हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...