सायकलपटू शाहीदला "एशिया कप' गाठायचाय.. 

shahidahmad
shahidahmad

शाळेत असताना त्याला ऍथलेटिक्‍सची आवड होती. 400 मीटरमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. परंतु पदक मिळवून काय करायचं? माहीतच नसल्याने स्पर्धाच खेळला नाही. नववी व दहावीत असताना सांगलीत सायकलिंग करणारी मुले पाहून आकर्षण निर्माण झाले. साध्या सायकलवरून त्याने स्पर्धा गाजवल्या. बारावी झाल्यानंतर वडिलांनी इंपोर्टेड सायकल दिली. दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर अंतर कापताना खेळातील राजकारणाचे अडथळे, टप्पेटोणपेही त्याने पार केले. अलिगड (युपी) येथील 140 कि. मी. अंतराच्या नॅशनल सिनिअर मास्टर्ट स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्राला कास्यपदक मिळवून दिले. उपेक्षित राहिलेल्या जिगरबाज खेळाडूचं नाव शाहीदअहमद शब्बीर जमादार...त्याला समोर एकच "टार्गेट' दिसते ते म्हणजे "एशिया कप'..! 

शाहीदअहमद म्हणतो..माझे पप्पा आर्मीतून निवृत्त झालेत. मम्मी अतिका मुख्याध्यापिका आहेत. पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये सातवी-आठवी शिकलो. सांगलीत इमॅन्युअल स्कूलमध्ये नववीत दाखल झालो. सायकलचे आकर्षण निर्माण झाल्यामुळे ऍथलेटिक्‍स सोडून तिकडे वळलो. बारावीपर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या. शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना पहिल्या वर्षी देशात चौथा क्रमांक मिळवला. दुसऱ्यावर्षी अपघातामुळे स्पर्धेला मुकलो. तिसऱ्या वर्षी पटियाळा येथे रौप्यपदक मिळवले. 40 वर्षांत विद्यापीठाला सायकलिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले. 

माझी कामगिरी बघून पंजाबमधील अमृतसर विद्यापीठाने मला बोलवून घेतले. प्रशिक्षक राजेश यांनी मला मार्गदर्शन केले. तेथे खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि माहोल बघून भारावलो. दररोज दीडशे किलोमीटर सायकलिंग करणे रोजच्या जेवणातील व्हिटॅमिन्समुळे शक्‍यच नव्हते. कोणीही मदत केली नाही. डाएट आणि प्रोटीनच्या खर्चासाठी जत्रा, यात्रेतल्या स्पर्धा मारल्या. अमृतसरमध्ये ऑल इंडिया रोड नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. ऑल इंडिया ट्रॅक नॅशनलमध्ये कास्यपदक मिळवले, तर नोव्हेंबर 2016 मध्ये अलिगडच्या नॅशनल सिनिअर मास्टर्ट स्पर्धेत सांगली आणि महाराष्ट्राला प्रथमच कास्यपदक मिळवून दिले. 

शाहीदअहमद म्हणतो, "दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर सायकलिंगसाठी फार खर्च येतो. नोकरी नसली तरी स्पर्धातून मिळणाऱ्या बक्षिसातून कसाबसा खर्च भागवतो. कोणाचीही मदत न घेता अनेक अडचणी, खाचखळग्यांवर मात केली. माझ्या पप्पा आणि मम्मीने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच एवढा टप्पा पार केला. बस्स..आता "एशिया कप' एवढेच माझे "टार्गेट' आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com