महम्मद शमीची दुसऱ्या डावातील भेदक

महम्मद शमी
महम्मद शमी

महम्मद शमीने निम्मा संघ बाद करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. भारतीय मध्यमगती गोलंदाजाने मायदेशातील कसोटीच्या चौथ्या डावात निम्मा संघ बाद करण्याचा प्रसंग 1996 नंतर प्रथमच घडला. जवळपास तेवीस वर्षापूर्वी अहमदाबादच्या कसोटीत जवगल श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. 

- मायदेशातील कसोटीत चौथ्या डावात निम्मा संघ बाद करणारा शमी हा पाचवा भारतीय मध्यमगती गोलंदाज. यापूर्वी करसन घावरी, कपिल देव, मदनलाल, जवगल श्रीनाथ.

- प्रतिस्पर्ध्यांच्या दुसऱ्या डावात निम्मा संघ बाद करण्याची कामगिरी शमीकडून तिसऱ्यांदा. त्याने दुसऱ्या डावात 15 वेळा. गोलंदाजी करताना 40 फलंदाज 17.70 च्या सरासरीने टिपले आहेत. त्याचवेळी 16 पहिल्या डावात 37.56 च्या सरासरीने 16 विकेट

- आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील एकाही विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाचा सहभाग नाही, पाच त्रिफळाचीत, तीन पायचीत. एक गोलंदाजाकडे झेल देऊन बाद, तर एक यष्टिरक्षकाकडे झेल देऊन

- शमीकडून चार फलंदाज त्रिफळाचीत, ही कामगिरी यापूर्वी जसप्रीत बुमराकडून.

- आफ्रिकेच्या पहिल्या डावात 400 पेक्षा जास्त धावा, तरीही द्विशतकी पराभव. हे त्यांच्याबाबत केवळ पाचव्यांदा.

- प्रतिस्पर्ध्यांनी चारशे धावा केल्यावर भारताचा हा तिसरा मोठा विजय. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2016-17 च्या मालिकेत चेन्नई आणि मुंबई कसोटीत डावाने विजय.

- भारताचा मायदेशातील गेल्या तीस कसोटीत 24 विजय, सर्वोत्तम कामगिरी

- अश्‍विनचे साडेतीनशे बळी 66 कसोटीत. मुथय्या मुरलीधरनच्या वेगानेच ही कामगिरी. मात्र अश्‍विनने मुरलीधरनपेक्षा 18 डावांत जास्त गोलंदाजी केली, पण मुरलीधरनपेक्षा तीन हजार चेंडू कमी टाकले आहेत.

- या कसोटीत 37 षटकार. कसोटी इतिहासातील सर्वाधिक. पाकिस्तान - न्यूझीलंड (2014) कसोटीचा 33 षटकारांचा विक्रम मोडीत.

- सातव्या क्रमांकावर आल्यावरही शंभरपेक्षा जास्त चेंडू खेळण्याचा सेनुरान मुथुसामीचा पराक्रम. ही कामगिरी केलेला तिसरा फलंदाज. मुथुसामी पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत नाबाद, तसेच तीसपेक्षा जास्त धावाही. ही कामगिरी केलेला एकमेव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com