राजस्थानच्या चाहत्यांची शेन वॉर्नकडून माफी
पुणे - चेन्नईविरुद्धच्या खराब खेळाबद्दल राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर शेन वॉर्न याने संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. चाहत्यांनी आशा सोडू नये, अशी विनवणीसुद्धा त्याने केली. वॉर्न सध्या छोट्या सुटीसाठी ऑस्ट्रेलियात परतला आहे. त्याने पहिल्या ट्विटमध्ये आशा व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते, की ‘‘सामन्याचा पहिला टप्पा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात फारच सामान्य ठरला. ‘वॅट्टो’ने (शेन वॉटसन) उत्तम खेळ केला. चेन्नईच्या अपेक्षेपेक्षा किमान २० धावा कमी आहेत, त्यामुळे संजू सॅमसन व बेन स्टोक्स यांच्या फलंदाजीकडे लक्ष ठेवा.’’

नंतर राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर वॉर्नने ट्विट केले की, ‘‘आमचे खेळाडू तिन्ही क्षेत्रांत कमी पडले. ते प्रयत्न करीत आहेत. त्यांचा खेळ चांगला होईल. आशा सोडू नका. आम्ही खेळात सुधारणा करू आणि पुढील दोन सामने जिंकू.’’