"डॅड, माझं ह्रदयंच तुटलंय..." वॉर्नच्या निधनानंतर मुलीची भावूक पोस्ट

तीच्या या पोस्टमध्ये वडिलांना गमावल्याचं दु:ख स्पष्ट दिसत आहे.
Shane Warne
Shane WarneSakal

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाला जवळपास एक आठवडा पूर्ण झाला आहे. या निधनाने क्रिकेट जगतातील सर्वांनाच धक्का बसला होता. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी या दिग्गज खेळाडूचे निधन होईल असा विचारही कुणी केला नव्हता. अशातच शेन वॉर्न याच्या मुलीची पोस्ट समोर आली आहे. ज्यामध्ये वडिलांना गमावल्याचं दु:ख स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान थायलंड येथे आपल्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी गेलेल्या वॉर्नने अशा प्रकारे जगाला सोडून सर्वांना दु:खी केलं आहे. आपल्या कारकिर्दीत वॉर्न कधी मैदानात तर कधी मैदानाच्या बाहेर वादात सापडला आहे. त्याच्या निधनानंतर आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत.

दरम्यान वॉर्नच्या मुलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलंय की, "डॅड, माझं ह्रदय तुटलं आहे. तुम्ही आत्ता आमच्यात नाहीत यावर विश्वासचं बसत नाही. आयुष्य खूप क्रूर आहे. तुम्हाला आमच्यातून खूप लवकर दूर नेले. आपल्या शेवटच्या हसण्या खेळण्याच्या आठवणी मी कायम जपणार आहे. आम्ही खूप आनंदी होतो. मी सारखी मस्करीत बोलायचे की, मला तुमचे जीन्स मिळाले आहेत. पण आता मी त्या गोष्टीचा जास्त अभिमान बाळगू शकत नाही कारण आता तुम्ही आमच्यात नाहीत. तुम्हाला माझे वडील म्हणून सांगायला मला कायम अभिमान वाटत राहील. मी खूप नशीबवान आहे की तुम्ही मला वडील म्हणून लाभले. मी तुमच्यावर अगणित प्रेम करते, तुम्ही कायम आठवणीत राहाल." अशा भावनिक शब्दांत तीने ही पोस्ट केली असून तीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

दरम्यान शेन वॉर्न यांच्यावर ३० मार्चला अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्याआधी त्याच्या पार्थिवाला मेलबर्न क्रिकेट मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी लाखो चाहते उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com