शेन वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी तिकिट? 30 मार्चला मेलबर्नवर अंत्यसंस्कार

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं ४ मार्च रोजी निधन झालं. वॉर्नचे पार्थिव गुरुवारी एखा खासगी जेटने बँकॉकमधून मेलबर्नमध्ये आणण्यात आले.
Shane Warne
Shane Warne

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं ४ मार्च रोजी निधन झालं. वॉर्नचे पार्थिव गुरुवारी एखा खासगी जेटने बँकॉकमधून मेलबर्नमध्ये आणण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रध्वजात गुंडाळलेला त्याचा मृतदेह शवपेटीतून मेलबर्नमध्ये पोहोचला. वॉर्नचे निधन थांयलंडमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने झाले होते. खासगी विमानाने स्थानिक वेळेनुसार रात्री साडे आठच्या सुमारास त्याचे पार्थिव मेलबर्नमध्ये आणलं गेलं. शेन वॉर्नवर ३० मार्चरोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचीही तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे पार्थिव घेऊन आलेलं खासगी विमान गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास मेलबर्नमधील एस्सेनडन फिल्ड्स एअरपोर्टवर उतरलं. वॉर्नचे स्वीय सहायक हेलेन नोलन यांच्यासह काही जवळचे मित्र विमानतळावर उपस्थित होते.

व्हिक्टोरिया प्रिमियरच्या डॅन अँड्र्यू यांनी शेन वॉर्नच्या अंत्यसंस्काराच्या तयारीची माहिती दिली. त्यांी सांगितलं की, ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्यांच्या लाडक्या क्रिकेटपटूला अखेरचा निरोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर देता येणार आहे. ३० मार्च रोजी सायंकाळी वॉर्नवर अंत्यसंस्कार होतील. याबाबतची अधिक माहिती आणि तिकिटांबद्दल लवकरच कळवले जाईल असं डॅन अँड्र्यूज यांनी म्हटलं आहे. यामुळे वॉर्नचे अंत्यदर्शनासाठी तिकिट घ्यावं लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झाला त्यादिवशी वॉर्न आणि त्याचे तीन मित्र एका प्रायव्हेट व्हिलामध्ये थांबले होते. दरम्यान रात्री जेवण करण्यासाठी शेन वॉर्न आला नाही तेव्हा त्याला पाहण्यासाठी मित्र त्याच्या रूममध्ये गेला. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्याच वेळी मित्रांनी त्याला CPR देऊन त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आणि त्वरित अॅब्युलन्स बोलविण्यासाठी कॉलही केला. वॉर्नला एमर्जन्सीमध्ये थाय इंटरनॅशल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे वॉर्नला साधारण ५ मिनिटांपर्यंत CPR देण्यात आला पण, डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाही. त्यांनी मृत्यूचे कारण सांगितले नाही पण मृत्यू संशयास्पद असल्याचे त्यांना वाटले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com