Maharashtra Wrestling | खेळात राजकीय हस्तक्षेप नको; पवारांचे मत

sharad Pawar
sharad Pawar ESAKAL

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तीगीर संघटनेच्या काही संबंध नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केली आहे. मविआ सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तोच शरद पवार यांना अजून मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर कुस्तीगीर संघटना (maharashtra state wrestling) बरखास्त करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या संदर्भात शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप नको असे वक्तव्य केलं.

sharad Pawar
कुस्तीगीर संघटनेत राजकारण नाही... शरद पवार पहिल्यादाच स्पष्ट बोले

भारतीय कुस्ती महासंघने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बर्खास्त केल्यानंतर त्याचा संबंध महाराष्ट्रातील सत्ता बदलाशी जोडला जात आहे. यावर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने भारतीय कुस्ती महासंघाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा बर्खास्तीचा निर्णय झाला आहे. मी त्यांच्या बैठकीत देखील जात नाही. क्रीडा क्षेत्राला सोयी सुविधा देणे, क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी सुविधा पुरवणं हे माझं काम आहे.'

शरद पवार पुढे पुढे म्हणाले की, 'खेळाडूंच्या प्रश्नासाठी मी कुस्ती परिषदेवर गेलो. ग्रामीण खेळाडूंना मी मदत केली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे हे कुस्ती परिषदेचे काम आहे.' याचबरोबर खेळात राजकीय हस्तक्षेप होऊ नये असे देखील शरद पवार म्हणाले.

sharad Pawar
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद प्रकरण : खेळात राजकीय हस्तक्षेप नको; पवारांचे मत

शरद पवार वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. क्रिकेटचा पण मी अध्यक्ष होतो. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावे, हे मी करत होतो. त्यांना काही अडचणी आल्या, शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करतो, असे ते म्हणाले. बाळासाहेब लांडगे यांच्या कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन करण्यात आले होते. अखिल भारतीय कुस्ती महासंघाकडे तक्रार देखील करण्यात आली. त्यावर स्ट्राँग अॅक्शन घेतील असे वाटत होत. पण तसं काही झालं नाही असे पवार म्हणाले. दिल्लीत कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांना भेटून त्या दुरुस्त्या करायला लावणार आहेत, तर मान्यता कायम राहील याची काळजी घेऊ. आम्हाला राष्ट्रीय संघटना मदत करतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केली आहे.

sharad Pawar
PHOTO: 'कर्णधार' बुमराहचा दणका; पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आगामी दिवसांमध्ये ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार असून हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूकसह इतर बाबींवर लक्ष देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com