एमसीए अध्यक्षपदाचा पवारांचा राजीनामा

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी 70 वर्षांची कमाल मर्यादा निश्‍चित केली आहे. तसेच राजकीय व्यक्तींना संघटेनेच्या अध्यक्षपदी राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबई - लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा व्यवस्थापकिय समितीकडे पाठविली असून, त्यावर समिती निर्णय घेणार आहे.

लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी 70 वर्षांची कमाल मर्यादा निश्‍चित केली आहे. तसेच राजकीय व्यक्तींना संघटेनेच्या अध्यक्षपदी राहण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व शिफारशी मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्वीकारल्या असल्याचे सांगण्यात येत असून, आता त्यांच्या राजीनाम्याबाबत व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे.

शरद पवार हे यापूर्वी दोनवेळा एमसीएचे अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी 2010 ते 2012 या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सुनावणीत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाल्यास तुरूंगात जावे लागेल अशा कडक शब्दांत फटकारले होते. 

Web Title: Sharad Pawar steps down from the president's post of Mumbai Cricket Association