लॉर्ड ठाकुर अन् रोहितची पत्नी रितीकामध्ये भांडण; कमेंट बॉक्समध्ये वादाची ठिणगी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉर्ड ठाकुर अन् रोहितची पत्नी रितीकामध्ये भांडण; कमेंट बॉक्समध्ये वादाची ठिणगी?

लॉर्ड ठाकुर अन् रोहितची पत्नी रितीकामध्ये भांडण; कमेंट बॉक्समध्ये वादाची ठिणगी?

आयपीएलमध्ये धडाकेबाज क्रिकेट विराट कोहली आणि माजी क्रिकेट गौतम गंभीर यांच्यात मैदानावर झालेला वाद चांगलाच गाजला. दरम्यान आता आणखी एक वादाची अपडेट समोर आली आहे. पण हा वाद दोन क्रिकेटरमधील नाही. तर लॉर्ड शार्दूल ठाकुर आणि रोहित शर्माची पत्नि रितीकामध्ये आहे. जो सध्या चर्चेत आला आहे. (Shardul Thakur engages in fun banter with Rohit Sharma wife Ritika Sajdeh)

त्या पोस्टमुळे कमेंट बॉक्समध्ये वादाची ठिणगी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा खेळाडू शार्दूल ठाकूरने सोशल मीडियावर एक फोटो केला होता. त्यावर रोहित शर्माची पत्नि रितीकाने कमेंट केली आहे.

लॉर्ड ठाकूरने फोटोसह एक कॅप्शन दिली आहे. "Let eternal forces back you instead #st54" असं शार्दुलने कमेंटमध्ये म्हटलं आहे. (Latest Sport News)

शार्दूलच्या या फोटोवर रोहितची पत्नी रितीका सजदेहने गमतीशीर कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये रितीका म्हणते की, मला दिसतंय की, तू छान फोटो येण्यासाठी पोझ देतोयस. मात्र तुला अजून प्रयत्न करण्याची गरज आहे, थँक्यू. (Latest Sport News)

तर दुसरीकडे रितीकाच्या या कमेंटला शार्दूलने देखील उत्तर दिलंय. तो म्हणालाय, no wonder there was fire without smoke. (Latest Sport News)

टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडसाठी रवाना देखील झाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी 15 सदस्यांची टीम आणि 3 स्टँडबाय खेळाडू रवाना झालेत. यामध्ये ऑलराऊंडर शार्दुल ठाकुर देखील इंग्लंडला रवाना झाला आहे.