Shardul Thakur Wedding : रब्बा ने तुझको बनाने पर... शार्दुल ठाकूरच्या लग्नात श्रेयसच्या 'गायकी'चा जलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Wedding

Shardul Thakur Wedding : रब्बा ने तुझको बनाने पर... शार्दुल ठाकूरच्या लग्नात श्रेयसच्या 'गायकी'चा जलवा

Shardul Thakur Wedding : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आज (दि. 27) आपली गर्लफ्रेंड मिताली परूळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हा विवाहसोहळ्यापूर्वी अनेक कार्यक्रमांचा रेलचेल शार्दुल ठाकूरच्या पालघर येथील घरी सुरू होती. यावेळी भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी देखील हजेरी लावली. यात श्रेयस अय्यरने देखील भरपूर कल्ला केला आहे.

श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शार्दुल ठाकूर मितालीसोबत एका रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसतोय. हे गाणे ब्रम्हास्त्र चित्रटातील आहे. विशेष म्हणजे हे गाणे शार्दुलसाठी श्रेयस गाताना या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शार्दुल ठाकूरच्या हळदी समारंभाचे व्हिडिओ देखील अशाच प्रकारे तुफान व्हायरल झाले होते. या व्हिडिओत शार्दुल ठाकूर हा झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसतोय. तसेच त्याला यावेळी त्याच्या मित्रांनी खांद्यावर देखील उचलून घेतल्याचे दिसते.

विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरने आपला विवाह सोहळा मोजक्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत साजरा करायचं ठरवलं आहे. मात्र त्याचे ज्या प्रकारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून त्याने या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी घातलेली दिसून येत नाही. शार्दुलच्या या दिलदारपणामुळे त्याच्या चाहत्यांना देखील व्हिडिओ आणि फोटोंच्या मार्फत विवाहसोहळ्यात सामील होता आलं आहे.

(Sports Latest News)