राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद मिळविले. 

पुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद मिळविले. 

एमएसएलटीए आणि एआयटीएच्या मान्यतेने रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटातील अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या (पुणे) पाचव्या मानांकित शरण्या गवारेने दिल्लीच्या विपाशा मेहराचा ६-२, ४-२ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. सुमारे एक तास वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या सामन्यात शरण्या गवारेने सुरेख सुरवात करताना विपाशा  मेहराची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखून हा सेट ६-२ असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीला दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला व स्वतःच्या सर्व्हिस राखल्या. सामन्यात ४-२ अशी स्थिती असताना विपाशाला बरे वाटत नसल्याने तिने लढत सोडून दिली. लक्ष्यचा पाठिंबा असलेली विजेत्या शरण्या गवारेचे यंदाच्या मोसमातील हे पहिलेच विजेतेपद असून, ती टेनिस एक्‍सलन्स अकादमीत आदित्य मडकेकर आणि कैफी अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.  

त्याआधी उपांत्य फेरीत शरण्या गवारेने सातव्या मानांकित गुजरातच्या भक्ती शहाचा ६-१, ६-० असा, तर दिल्लीच्या विपाशा मेहराने स्वरदा परबचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. 

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ लगान व जोधा अकबरमधील अभिनेते अमिन हाजी यांच्या हस्ते झाला. या वेळी स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व वैशाली शेकटकर हे उपस्थित होते. 

Web Title: sharnya winners in the national tennis tournament