वेस्ट इंडीजच्या शेल्डनने केला धोनीला सॅल्यूट

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने धोनीच्या देशप्रेमाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत दोन महिने निम लष्करी दलात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

नली दिल्ली : वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने धोनीच्या देशप्रेमाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत दोन महिने निम लष्करी दलात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कॉट्रेलने धोनीचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. ''हा माणूस मैदानावर अनेकांचे प्रेरणास्थान आहे. मात्र, मैदानाबाहेर ही माणूस प्रेरणादायी आहे. त्याच्या कामाशिवायही को देशाला बरेच काही देतो. धोनी आणि त्याची पत्नी यांचे देशावरील आणि एकमेकांवरील प्रेम अत्यंत प्रेरणादायी आहे,'' असे ट्विट त्याने केले आहे. 

कॉट्रेल या जमैकाच्या लष्कराचा जवान आहे. त्याने वेळोवेळी आपल्या लष्कराप्रती आदर व्यक्त केला आहे. तो प्रत्येक विकेटनंतर मैदानातच सॅल्यूट करतो. त्याची ही स्टाईल विश्वकरंडकादरम्यान खूप प्रसिद्ध झाली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheldon Cottrell Salutes MS Dhonis Love For The Country