हार्दिकच्याजागी 'या' अष्टपैलूला मिळू शकते पदार्पणाची संधी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

हार्दिकच्या जागी रवींद्र जडेजा आहेच मात्र, त्या व्यतिरिक्त आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याची सध्या संपूर्ण देशात सर्वांत जास्त चर्चा केली जात आहे. 

नवी दिल्ली : भारताची निवड समिती नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेत नवनवे प्रयोग करणार यात काहीच शंका नाही. ट्वेंटी20 विश्वकरंडकाला केवळ एक वर्ष उरल्याने निवड समिती संघबांधणीचा विचार करु लागली आहे. अशातच भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याने त्याला बांगलादेशविरुद्ध खेळता येणार नाही. 

पंत सावध रहा; धोनीचा खरा वारसदार बांगलादेशविरुद्ध करणार एण्ट्री

हार्दिकच्या जागी रवींद्र जडेजा आहेच मात्र, त्या व्यतिरिक्त आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याची सध्या संपूर्ण देशात सर्वांत जास्त चर्चा केली जात आहे. 

Shivam Dube

हार्दिकच्या जागी शिवम दुबेला संगात स्थान मिळू शकते. असे झाल्यास हे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण असेल. शिवमने गेल्या रणजी करंडकात तुफान कामगिरी केल्याने रॉयल चॅलेंडर्स बंगळूर संघाने त्याला तब्बल पाच कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्यानंतर त्याला भारत अ संघात स्थानही मिळाले आणि त्याने तिथेही चांगली कामगिरी केली होती. 

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर गेल्याने आता शिवमला संघात स्थान मिळू शकते. 16 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये त्याने 48.19च्या सरासरीने 1012 धावा केल्या आहेत आणि 40 बळी घेतले आहेत. तसेच 19 ट्वेंटी20 सामन्यांमध्ये त्याने 242 धावा केल्या आहेत आणि 14 बळी घेतले आहेत. 

उपलब्ध असला तरी आता त्याला संघात स्थान नाहीच; निवड समितीचा कठोर निर्णय 

मागील दोन वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होता. आता बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही नव्या खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. बांगलादेश भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी20 सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यास येत आहे. ट्वेंटी20 मालिकेला दिल्लीमध्ये 3 नोव्हेंबरला सुरवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ 24 ऑक्टोबरला निवड केला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivam Dube Set To Be Selected For Bangladesh Series