Maharashtra Kesari: कोर्टात जाणार! पंचांकडून आधी शिवीगाळ, शिवराज राक्षेचा दावा

Shivraj Rakshe Suspension Controversy: ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांना लाथ मारल्यानंतर शिवराज राक्षेवर निलंबनाची कारवाई झाली. यानंतर आता त्याने न्यायालयात दाद मारणार असल्याचे म्हटले आहे.
Shivraj Rakshe
Shivraj RaksheSakal
Updated on

Maharashtra Kesari: अहिल्यानगर येथे झालेली ६७ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रविवारी (२ फेब्रुवारी) मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे पडसाद अद्यापही महाराष्ट्र कुस्ती वर्तुळात उमटताना दिसत आहेत. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने प्रतिष्ठीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र, त्याने खेळलेले उपांत्य आणि अंतिम सामना वादग्रस्त ठरला.

रविवारी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. यामध्ये पंचांनी पृथ्वीराजच्या बाजूने निकाल दिला. पण हा निर्णय शिवराजला अमान्य होता.

Shivraj Rakshe
Maharashtra Kesari: शिवराजने लाथ मारण्याऐवजी पंचाला गोळ्याच घालायला हव्या होत्या; महाराष्ट्र केसरी राड्यावर चंद्रहार पाटील संतापले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com