World Cup 2019 : सेहवाग-शोएबने सानियावर टीका करणाऱ्यांना सुनावले खडे बोल

shoaib-akhtar
shoaib-akhtar

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवागने बुधवारी (19 जून) शोएबच्या यु-ट्युब चॅनलवर एकत्र येऊन सानिया मिर्झावर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले.

रविवारी (16 जून) ओल्ड ट्रॅफोर्ड येथे झालेल्या भारत-पाकिस्तान या 'हाय व्होल्टेज' सामन्यात पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला. पाकिस्तानला आजपर्यंत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारताकडून सलग सातव्यांदा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात आपले खातेही उघडू न शकलेला फलंदाज शोएब मलिक आणि त्याची पत्नी व प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा सामन्यानंतर एकत्र जेवण घेताना दिसले होते.  

सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी या जोडप्याचे एकत्र व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त पाकिस्तानी चाहत्यांनी  सानिया मिर्झाला ट्रोल करायला सुरूवात केली. याच प्रकरणात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने चाहत्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. स्वत:च्या यु-ट्युब चॅनलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत शोएबने त्याचे म्हणणे मांडले आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही शोएबच्या व्हिडीओमध्ये उपस्थिती लावून शोएबच्या मतांना सहमती दर्शवली आहे. 

शोएब म्हणाला, "लोक सानिया मिर्झाला पाकिस्तानच्या पराभवासाठी दोष देत आहेत. त्यात तिचा काय दोष आहे? अनेकदा तिला भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांच्या अशा वागण्याला सामोरे जावे लागते. यावेळी पाकिस्तानी तिच्या मागे आहेत.  ते तिला विचारत आहेत की ती तिथे गेलीच का ? पण शोएब मलिक हा तिचा पती आहे आणि ते जर एकत्र जेवण्यासाठी गेले तर त्यांनी काय चूक केली ? "

सेहवागनेही स्पष्ट केले की, " खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. मला वाटत नाही की आपण वैयक्तिक जीवन त्यांच्या व्यावसायिक करिअरशी कनेक्ट करू शकतो. मागे जेव्हा विराट कोहली एका सामन्यात आऊट झाला होता आणि सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा तेथे होती तेव्हाही मी हेच म्हणालो होतो की आपण कोणाच्याही कुटुंबावर टिप्पणी करू शकत नाही. आपण आपल्या संघाबद्दल आणि आपल्या खेळाडुंबद्दल कितीही भावनात्मक असलो तरीही आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलु शकत नाही. सानिया आणि मलिक कुठे जातात, ते काय खातात.. यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com