नेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य

वृत्तसंस्था
रविवार, 8 एप्रिल 2018

सोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदक पटकाविले तर हिना सिद्धू हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आज चौथ्या दिवशी भारताला दुसरे सुवर्ण मिळाले. यामुळे भारताच्या खात्यात सहा सुवर्ण झाली आहेत. मनूने 240.9 गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. हिनाने 234 गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले. तर, ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियाबोविच 214.9 गुण मिळवीत ब्राँझपदक मिळविले.

सोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.

Web Title: Shooter Manu Bhaker wins gold Heena Sidhu silver in womens 10m air pistol in CWG