वर्ल्डकप नेमबाजी चौथ्यांदा भारतात

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल. 

मुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल. 

जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचेही यजमानपद भारतास देण्यात आले. यापूर्वीच 2019 च्या फेब्रुवारीत दिल्लीत विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. यापूर्वी 2017 च्या फेब्रुवारी- मार्चमध्ये तसेच ऑक्‍टोबरमध्ये विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा दिल्लीत झाली होती. 

या स्पर्धेद्वारे भारतीय नेमबाजीचा दर्जा उंचावण्यास तसेच प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल. भारतातील 2020 च्या स्पर्धेद्वारे भारतीय ऑलिंपिकसाठी जास्तीत जास्त कोटा मिळवतील, असा विश्‍वास भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी व्यक्त केला. यापूर्वी आशियाई शॉटगन (नोव्हेंबर-डिसेंबर 2012), आशिया एअरगन (सप्टेंबर-ऑक्‍टोबर 2015) आणि आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा (जानेवारी-फेब्रुवारी 2016) या स्पर्धाही भारतात झाल्या आहेत.
 

Web Title: shooting World Cup fourth time in India