गोळाफेकीतील तिहेरी विश्‍वविजेती

नरेश शेळके
शनिवार, 9 जुलै 2016

जागतिक ॲथलेटिक्‍समध्ये फक्त नऊ ॲथलिट्‌सने ज्युनिअर, युवा, आणि सीनियर अशा तिन्ही गटांत विश्‍वविजेतेपद मिळविले आहे. त्यात न्यूझीलंडची गोळाफेकीतील सलग दोन वेळची ऑलिंपिकविजेती ३२ वर्षीय व्हॅलेरी ॲडम्सचा समावेश आहे. ऑलिंपिकच्या महिला गोळाफेकीच्या इतिहासात फक्त रशियाच्या तमारा प्रेसला सलग दोनदा सुवर्णपदक मिळविता आले आहे. व्हॅलेरीने ही बरोबरी बीजिंग व लंडनमध्ये केली आहे. रिओमध्ये सुवर्णपदक जिंकून तिला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेनंतर निवृत्त होईल. त्यामुळे रिओ ही माझी शेवटची ऑलिपिंक स्पर्धा आहे, असे व्हॅलेरीने जाहीर केले आहे.

गोळाफेकीत निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या व्हॅलेरीची कथा तशी रंजक आहे. तिचे वडील सिडनी ॲडम्स रॉयल नेव्हीत होते. निवृत्तीनंतर ते न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. त्यांना पाच जोडीदारांपासून १८ अपत्ये झाली. त्यापैकी व्हॅलेरीचा क्रमांक १२ वा आहे. तिची आई लिलिकाचे सिडनी ऑलिंपिकच्या उद्‌घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. सिडनीत तिला सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. मात्र, चार वर्षांनी ती अथेन्समध्ये सहभागी झाली. या वेळी तिचा नववा क्रमांक आला. या अपयशातून खचून न जाता व्हॅलेरीने कठोर सराव सुरूच ठेवला. त्यापूर्वी १९९८ मध्ये तिची ओळख भालाफेकपटू क्रिस्टेन हेलरसोबत झाली. पुढील ११ वर्षे तो तिचा प्रशिक्षक होता. आता जीन पिरे एगर तिचा प्रशिक्षक आहे. ६ फूट ४ इंच उंची असलेल्या व्हॅलेरीने सर्वप्रथम २००१ मध्ये विश्‍व युवा आणि पुढच्याच वर्षी विश्‍व ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यशाच्या पायऱ्या चढत असताना वरिष्ठ गटात तिला सुवर्णपदक हुलकावणी देत होते. २००७ मध्ये ओसाका येथे तिने विश्‍वविजेतेपदाचा मान मिळविला. यानंतरच्या पुढील तीन स्पर्धांत तिला कुणीही पराभूत करू शकले नाही. बीजिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून न्यूझीलंडला १९७६ नंतर प्रथमच ॲथलेटिक्‍समध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. लंडनमध्ये तिला रौप्यपदक मिळाले होते. मात्र, सुवर्णपदक विजेती नादिया ओस्तापुचक उत्तेजक सेवनात अडकल्याने व्हॅलेरीला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. दुखापतीमुळे ती गेल्या वर्षीच्या विश्‍व स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. काही महिन्यांपूर्वी तिच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून सावरल्यानंतर तिने सराव सुरू केला असून रिओत तिने सुवर्णपदक जिंकावे, या उद्देशानेच तिला न्यूझीलंड संघात संधी देण्यात आली आहे. 

व्हॅलेरीची महत्त्वपूर्ण कामगिरी

ज्युनिअर विश्‍व अजिंक्‍यपद - २००२ - सुवर्ण

युवा विश्‍व अजिंक्‍यपद - २००१ - सुवर्ण

इनडोअर विश्‍व अजिंक्‍यपद - २००८, १२, १४ - सुवर्ण, १० - रौप्य, १६ - ब्राँझ

विश्‍व अजिंक्‍यपद - २००७, ०९, ११, १३ - सुवर्ण, २००५-रौप्य

ऑलिंपिक - बीजिंग, लंडन (सुवर्णपदक)

राष्ट्रकुल - २००६, १०, १४ - सुवर्ण, ०२ - रौप्य

सर्वोत्कृष्ट फेक - २१.२४ मीटर. 

Web Title: Shot Putt triple champion