अबब! केरळच्या श्रीशंकरची आठ मीटर उंच उडी; जिंकले सुवर्णपदक

Shrishankar marked 8 meter high jump in Indian Grampy Athletics
Shrishankar marked 8 meter high jump in Indian Grampy Athletics

नागपूर : के. एस. बिजीमोल आणि मुरली या आंतरराष्ट्रीय ऍथलिट्‌सचा मुलगा असलेल्या एम. श्रीशंकरने आपल्या कारकिर्दीत लांब उडीत तिसऱ्यांदा आठ मीटर उडी मारण्याची किमया केली. पुढील वर्षीपर्यंत 8.50 मीटरपर्यंत उडी मारण्याची आशा बाळगून असलेल्या 20 वर्षीय श्रीशंकरने पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री ऍथलेटिक्‍स स्पर्धेत आठ मीटर उडी मारताना सुवर्णपदक जिंकले. 

सहा महिन्यांपूर्वी संगरूर येथे झालेली इंडियन ग्रांप्री ही त्याची यापूर्वीची भारतातील शेवटची स्पर्धा होती. त्यानंतर तो युरोपीमधील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता. त्यात बिश्‍केक येथील स्पर्धेत त्याने 7.97 मीटरपर्यंत मजल मारली होती. गेल्या वर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत अंकित शर्माचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढताना श्रीशंकरने प्रथम 8.11 व नंतर 8.20 मीटर अशी कामगिरी केली होती. यात कर्नाटकच्या सिद्धार्थ नाईकने रौप्य आणि हरियानाच्या साहिल महाबलीने ब्रॉंझपदक जिंकले. 

अर्चनाची प्रभावी कामगिरी 

महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत दोनच ऍथलिट्‌सचा समावेश असतानाही तमिळनाडूच्या एस. अर्चनाने प्रभावी कामगिरी केली. तिने 23.18 सेकंद ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ नोंदवली. मात्र, जागतिक स्पर्धेसाठी असलेली 23.02 सेकंदांच्या पात्रता गाठण्यात तिला अपयश आले. राष्ट्रीय पातळीवर दोनशे मीटर शर्यतीत ती दोन वर्षांनंतर प्रथमच भाग घेत होती. शंभर मीटर शर्यतीत द्युतीचंदने बाजी मारली. यात द्युतीने अर्चनाला दुसऱ्या स्थानावर ढकलताना 11.42 सेकंद अशी वेळ नोंदवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com