शुभम शिंदे, माधुरी गवंडी महाराष्ट्र संघाचे कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे - कुमार गटाच्या 43व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या शुभम शिंदे आणि ठाण्याच्या माधुरी गवंडी यांच्याकडे महाराष्ट्राच्या कुमार आणि कुमारी संघांचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे.

ही स्पर्धा 21 डिसेंबरपासून बडोद्यात मंजलपूर येथे सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या संघात पुण्यातील खेळाडूंचा वरचष्मा राहिला असून, दोन्ही संघांत पुण्यातील प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी हा संघ जाहीर केला.

संघ मुले ः शुभम शिंदे (कर्णधार), बबलू गिरी, सूरज महाडिक, राहुल मोहिते, गौरव गंगारे, प्रतीक गावंड, सूरज दुदले, रूपेश अधिकारी, अनिकेत पेवेकर, आकाश अडसूळ, अक्षय वढाणे, उमेश भिलारे, प्रशिक्षक ः शरद महाडिक
मुली ः माधुरी गवंडी (ठाणे), सोनाली हेळवी, आदिती जाधव, धनश्री पोटले, पूजा पाटील, अंजली मुळे, काजल जाधव, प्रगती कणसे, तेजश्री सारंग, समरीन बुरोडकर, देवयानी म्हात्रे, ऑलिस्का पीटर अल्मेडा, प्रशिक्षक ः संदीप पायगुडे

Web Title: Shubham Shinde, madhuri gavandi Maharashtra captain