थायलंड बॉक्‍सिंगमध्ये श्‍यामकुमार अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारताच्या श्‍यामकुमारने थायंलड आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. रोहित टोकसला 64 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली - भारताच्या श्‍यामकुमारने थायंलड आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. रोहित टोकसला 64 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

श्‍यामकुमारने मंगोलियाच्या गानुखयाग गानएरंडने याचा पराभव केला. श्‍यामने यापूर्वी 2015 मध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याची गाठ उझबेकिस्तानच्या हसनबॉय डुसामाटोव याच्याशी पडेल. हसनबॉल हा ऑलिपिक सुवर्णपदक विजेता आहे. त्याने कोरियाच्या किम उन सॉंग याचा पराभव केला.

अन्य एका लढतीत भारताच्या रोहित टोकस याला उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या अब्दुरामोव एल्नुर विरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. भारताने या स्पर्धेत सात सदस्यीय संघ पाठवला होता. त्यातील चार खेळाडूंचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

Web Title: shyamkumar final in thailand boxing