सिंधू बनणार उप जिल्हाधिकारी

पीटीआय
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

हैदराबाद - रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील भारताची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता आंध्र प्रदेशात उप जिल्हाधिकारी बनणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिला ऑलिंपिक पदकानंतर सरकारी सेवेचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तिला उप जिल्हाधिकारी या पदावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूनेदेखील हा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे तिची आई विजया यांनी सांगितले. ऑलिंपिक पदकानंतर रोख पारितोषिकांची खैरात सिंधूवर झाली असून, सध्या ती भारत पेट्रोलियममध्ये २०१३ पासून सहायक व्यवस्थापक या पदावर काम करत आहेत.

हैदराबाद - रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील भारताची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आता आंध्र प्रदेशात उप जिल्हाधिकारी बनणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिला ऑलिंपिक पदकानंतर सरकारी सेवेचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तिला उप जिल्हाधिकारी या पदावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूनेदेखील हा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे तिची आई विजया यांनी सांगितले. ऑलिंपिक पदकानंतर रोख पारितोषिकांची खैरात सिंधूवर झाली असून, सध्या ती भारत पेट्रोलियममध्ये २०१३ पासून सहायक व्यवस्थापक या पदावर काम करत आहेत. सिंधूने सरकारी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता तिला तिची ‘बीपीसीएल’मधील नोकरी सोडावी लागेल.

Web Title: Sindhu become Deputy Collector