सिंधूसमोर सातत्य राखण्याचे आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सरस कामगिरी करून दुबईतील वर्ल्ड सुपर सीरिज अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरण्याचा पी. व्ही. सिंधूचा इरादा आहे. ही स्पर्धा उद्यापासून (ता. २२) सुरू होईल. जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ स्पर्धक या स्पर्धेस पात्र ठरतात.

जागतिक क्रमवारीत गुण देण्याच्या पद्धतीनुसार सुपर सीरिज विजेतेपदासाठी ११ हजार मानांकन गुण मिळतात. त्याच वेळी गतस्पर्धेपेक्षा खराब कामगिरी झाल्यास गुणांचा फटका बसण्याचीही शक्‍यता असते. सिंधू गत वर्षी चायना सुपर सीरिजमध्ये पहिल्या फेरीत; तर हाँगकाँग स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराजित झाली होती. सिंधूला चायना सुपर सीरिज विजेतेपदाचा नक्कीच फायदा होईल. हाँगकाँगला चांगली कामगिरी झाल्यास तिचे दुबई तिकीटही पक्के होईल.
सध्या सिंधू (२७,४९०) अकराव्या; तर साईना नेहवाल (३५,४२०) आठव्या स्थानावर आहे. सिंधूने अव्वल आठ जणांमध्ये स्थान मिळवल्यास त्याचा फटका साईनास बसेल आणि तिला दुबईतील स्पर्धेस मुकावे लागेल. सिंधूने मानांकन किती आहे, याचा विचार न करता हाँगकाँग स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. 

साईनाला जागतिक क्रमवारीत प्रगती करण्यासाठी या स्पर्धेत सरस खेळ करावा लागेल. मात्र, साईना सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहोत, याचेच समाधान मानत आहे. अर्थात, साईना तसेच सिंधू उद्याच्या पहिल्या दिवशी कोर्टवर नसतील. त्या दिवशी पात्रता फेरीच्या लढती होतील. 

Web Title: Sindhu challenge to maintain consistency