सराव करताना सिंधूला दुखापत

पीटीआय
बुधवार, 28 मार्च 2018

नवी दिल्ली - जागतिक आणि ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूचा घोटा सराव करताना दुखावला; मात्र दुखापत गंभीर नसल्यामुळे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकेल, असे सांगितले जात आहे.

हैदराबादच्या पुल्लेला गोपीचंद अकादमीत सराव करताना सिंधूचा घोटा दुखावला. लगेचच एमआरआय तपासणी करण्यात आली. सिंधूने आज विश्रांती घेतली आहे. उद्याही (बुधवारी) विश्रांती घेतल्यावर गुरुवारपासून सिंधू पुन्हा सरावास सुरवात करेल, असे सिंधूचे वडील पी. व्ही. रमणा यांनी सांगितले. 

सिंधू उद्या केवळ स्ट्रेटनिंग करणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा सांघिक बॅडमिंटन स्पर्धा ५ एप्रिलपासून होईल. त्यामुळे तिच्या सहभागाबाबत चिंता बाळगण्याचे कारण नाही, असेही रमणा यांनी सांगितले. जागतिक क्रमवारीत तिसरी असलेल्या सिंधूकडून भारतास वैयक्तिक सुवर्णपदकाचीही आशा आहे. गतस्पर्धेत तिने ब्राँझ जिंकले होते.

Web Title: Sindhu hurt while practicing