सिंधूच्या यशाचा आनंद कश्‍यपच्या विजयाने वृद्धिंगत

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय यांनी हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जोरदार सुरुवात केली, पण त्याचवेळी साईना नेहवाल, समीर वर्मा सलामीलाच पराजित झाल्याने काहीशी निराशा आली होती, पण पारुपली कश्‍यपने जागतिक क्रमवारीत बाराव्या असलेल्या केंता निशीमोतो याला हरवून सुखद धक्का दिला.

मुंबई : पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय यांनी हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जोरदार सुरुवात केली, पण त्याचवेळी साईना नेहवाल, समीर वर्मा सलामीलाच पराजित झाल्याने काहीशी निराशा आली होती, पण पारुपली कश्‍यपने जागतिक क्रमवारीत बाराव्या असलेल्या केंता निशीमोतो याला हरवून सुखद धक्का दिला.

सिंधूने जागतिक क्रमवारीत 19 व्या असलेल्या किम गा एऊन हिच्याविरुद्धच्या विजयाची औपचारिकता 21-15, 21-15 अशी पूर्ण केली. प्रणॉयने चीनच्या हुआन यु झिआंग याचा 21-12, 21-17 असा पाडाव केला. जागतिक विजेत्या सिंधूने 36 मिनिटांतच बाजी मारली. काही आठवड्यांपूर्वी डेंग्यू झालेल्या प्रणॉयचा सहज विजय सुखावणारा होता.

साईना नेहवालला पुन्हा एकदा चीनच्या काई यान हिच्याविरुद्ध पराजित झाली. तिला 13-21, 20-22 पराभव पत्करावा लागला. साईनाला हा गेल्या सहापैकी पाच स्पर्धांत पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली आहे. समीर वर्माला वॅंग झु वेईविध 11-21, 21-13, 8-21 पराजय स्वीकारावा लागला. अश्‍विनी पोनप्पा-एन सिक्की रेड्डी यांना पुन्हा पहिली फेरी पार करण्यात अपयश आले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhu, kashyap win opening matches in hong kong