यामागुचीला हरवत सिंधूची विजयी सुरवात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ग्वांगझू (चीन) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने मोसमाच्या अखेरच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेला विजयी सुरवात केली असली, तरी अकाने यामागुचीचा प्रतिकार मोडून काढताना करावा लागलेला संघर्ष विसरता येणार नाही. 

गेल्या वर्षी सिंधू या स्पर्धेत उपविजेती होती. या वेळी ‘अ’ गटातून मोहिमेस सुरवात करताना तिने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख समन्वय राखत जपानच्या यामागुचीवर २४-२२, २१-१५ असा विजय मिळविला. पुरुष गटात मात्र भारताची सुरवात अपयशी ठरली. ‘ब’ गटात सातव्या मानांकित समीर वर्माला जपानच्या केंटो मोमोटाविरुद्ध १८-२१, ६-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले. 

कोर्टवरील संथ वातावरणात सिंधूने कमालीचा नियंत्रित खेळ केला. एकवेळ मागे राहून देखील तिने आपला संयम गमावला नाही आणि हेच तिच्या आजच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पहिला गेम २७ मिनिटे चालला. अचूकतेच्या जोरावर दोघी एकमेकींचा कस पाहत होत्या. सिंधू मध्याला ६-११ अशी मागे होती. यानंतरही तिने संयमाला आक्रमकतेची जोड देत बॅक हॅंड स्मॅशचा सुरेख वापर करत १९-१९ अशी बरोबरी साधली. आघाडी सतत बदलत असताना सिंधूने दाखवलेली मानसिकता महत्त्वाची ठरली आणि तिने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेमला यामागुचीने आक्रमक सुरवात केली. त्याला सिंधूने चोख उत्तर देत ३-१ अशी आघाडी घेतली. पण, त्यानंतर आघाडी बदलत राहिली. मध्यात यामागुची ११-१० अशी आघाडीवर राहिली. या मध्यानंतर यामागुचीकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत सिंधूने सलग चार गुणांची कमाई करत आघाडी घेतली. त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. तिने १८-११ अशी आघाडी भक्कम केली. सिंधूने २०-१४ असे सहा मॅचपॉइंट मिळविले. यामागुचीवर याचे दडपण आले. ती यातील एकच पॉइंट वाचवू शकली.

Web Title: Sindhu winning start