भारताच्या सहा ऍथलिट्‌सची निवड 

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

चेक प्रजाकसत्ताकमधील ओस्ट्रावा येथे 8 व 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॉन्टीनेंटल करंडक स्पर्धेसाठी भारताच्या सहा ऍथलिट्‌सची आशिया-पॅसीफिक संघात निवड करण्यात आली.
 

नागपूर - चेक प्रजाकसत्ताकमधील ओस्ट्रावा येथे 8 व 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॉन्टीनेंटल करंडक स्पर्धेसाठी भारताच्या सहा ऍथलिट्‌सची आशिया-पॅसीफिक संघात निवड करण्यात आली.

आशियाई ऍथलेटिक्‍स संघटनेने ही निवड केली. त्यात भालाफेकीत राष्ट्रकुल व ज्युनिअर विश्‍वविजेता नीरज चोप्रा, चारशे मीटरमधील आशियाई विजेता व राष्ट्रीय विक्रमवीर महम्मद अनस, चारशे मीटरमधील ज्युनिअर विश्‍वविजेती हिमा दास, ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीतील ब्रॉंझपदक विजेता अरपिंदर सिंग, आठशे व पंधराशे मीटरमधील राष्ट्रीय विक्रमवीर जिन्सॉन जॉन्सन, पंधराशे मीटरमधील आशियाई विजेती पी. यू. चित्रा आणि स्टीपलसेचमधील आशियाई विजेती सुधा सिंग यांचा समावेश आहे. 

Web Title: Six Indian athletes are selected for Continental Cup