SL vs IND : जाफरने लंकेला दिला रामायणाचा दाखला; ट्विट व्हायरल

जाफरने ट्विटच्या माध्यमातून भारताच्या ताकदीचा इशारा प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला दिलाय.
SL vs IND
SL vs INDPTI

SL vs IND : भारतीय संघाने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेसमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेचा कर्णधार दशुन शनाका याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. चेतन सकारिया, देवदत्त पदिक्कल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा या चौघांनी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. क्रुणाल पांड्याला झालेला कोरोनामुळे त्याच्या संपर्कातील अनेकांना क्वारंटाईन केल्यामुळे नवोदितांना संधी मिळणार हे आधीच पक्के होते. यासंदर्भात रंगलेल्या चर्चेत वासीम जाफरने नवा रंग भरल्याचे पाहायला मिळाले.

SL vs IND
SL vs IND : गब्बर टॉपर; ऋतूराज-पदिक्कलची छोटीखानी खेळी

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या वासीम जाफरने श्रीलंकेला सावध करणारे एक मजेशीर ट्विट शेअर केले. जाफरचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. वासीम जाफरने रामायणाचा दाखला देणारा हनुमानाचा एक फोटो शेअर केलाय. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघातील तळाचे फलंदाजही दमदार खेळ करत श्रीलंकेला शह देतील, असा विश्वास दाखवणाऱ्या ओळी जाफरने लिहिल्या आहेत. रामायणातील सीनचा दाखला देत श्रीलंकेला सावध करण्याचा जाफरचा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच पंसतीस उतरताना दिसतोय. त्याने शेअर केलेल्या फोटोने अनेकांना रामायणातील हनुमानाची कथा आठवल्याशिवाय राहणार नाही.

SL vs IND
Olympics: मनिका बत्राला नखरा महागात पडणार

भारतीय संघाच्या ताफ्यातील कोरोनाच्या शिरकावानंतरही भारतीय संघाने श्रीलंकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारुन जाफरने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेला विश्वास सार्थ केल्याचे दिसते. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरलीये. टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाने वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली होती. पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या धवनने संघाला 2-1 असा विजय मिळवून दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com