
WPL 2023: 3.4 कोटी गेले वाया! RCBचा पराभवाचा चौकार, चाहते संतापले
WPL 2023 RCB Smriti Mandhana : मुंबईमधील ब्रेबॉन मैदानावर आज महिला प्रिमियर लिगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि युपी वॉरियर्स या दोन संघांमधील लढत फारच एकतर्फी झाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची आतापर्यंत ही कामगिरी अत्यंत लाजिरवाणी राहिली आहे. संघाने स्पर्धेत खेळलेले चारही सामने गमावले आहेत. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ या स्पर्धेत इतर संघाच्या तुलनेत सर्वात वाईट कामगिरी करत आहे.
आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फॅन फॉलोइंग खूप जास्त असून महिला संघ असल्याने पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याच्या चाहत्यांच्या आशा वाढल्या होत्या, मात्र महिला संघाची निराशाजनक कामगिरी पाहून चाहतेही संतापले असून कर्णधाराला ट्रोल करत आहेत.
बंगळूरच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. बंगळूरच्या संघाला 138 धावांपर्यंतच मजल मारता आली. एलिस पेरी हिने बंगळूर संघातर्फे सर्वांत जास्त 52 धावांची खेळी केली. एक्लेस्टोन हिने 13 धावा देत बंगळूरच्या संघाचे चार फलंदाज बाद केले. यूपी वॉरियर्सच्या संघाने मात्र हे 139 धावांचे आव्हान अगदी सहज पार केले. युपीएच्या संघाने "एकही गड़ी न गमावता 13 षटकांमध्येच 139 धावांची खेळी केली कर्णधार अलिसा हिली हिने 16 धावांची आणि
पुण्याच्या देविका वैद्यने 31 धावांची खेळी करत युपीच्या संघाला दुसरा विजय मिळवून दिला. तीन सामन्यांमधील हा युपीच्या संघाचा दुसरा विजय आहे. तर बंगळूरच्या संघाला सलग चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले आहे. या -सलग चौथ्या पराभवासह बंगळूरचा संघ गुणतालिकेत सर्वांत खालच्या स्थानावर कायम आहे. तर युपीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.