SCL 2019 : निशादला ऑरेंज कॅप; अपूर्व प्लाझाचा तेजस पर्पल कॅपचा मानकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : सकाळ माध्यम समूह आयोजित सोसायटी क्रिकेट लीगमध्ये कमालीची रंगत आणि चुरस निर्माण झाली आहे.
दोन वीकेन्डमध्ये एकूण १२८ सामने झाले आहेत. त्यानंतर नेट रनरेटचा निकष लागू होणार असल्यामुळे सर्व सोसायट्यांचे खेळाडू कसून सराव करीत आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप अशा  किताबांसाठीसुद्धा कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

गोलंदाजीत सिंहगड रोडवरील अपूर्व प्लाझाचा तेजस पंचवाघ सहा विकेट घेऊन आघाडीवर आहे, पण पहिल्या दहा जणांच्या क्रमवारीत चार जणांना प्रत्येकी पाच विकेट मिळाल्या आहेत, तर शेवटचे पाच जण प्रत्येकी चार विकेट मिळवून या शर्यतीत कायम आहेत.

No photo description available.

फलंदाजीत कोथरूडमधील बळवंतपुरम साम्राज्य बी संघाचा  निशाद काळे सर्वाधिक १४० धावांसह आघाडीवर आहे. या किताबासाठीसुद्धा कडवी चुरस आहे. पहिल्या दहा जणांना संधी आहे. यातील दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या ११० धावा झाल्या आहेत.

No photo description available.

सामने केवळ निर्धारित सहा षटकांचे असले तरी त्यात तीन शतकांची, तसेच तब्बल ४४ अर्धशतकांची नोंद झाली आहे. याशिवाय दोन हॅट्‌ट्रिकही आहेत.
एसपी कॉलेज ग्राउंडवर सामने

या स्पर्धेचे सामने येत्या शनिवारी-रविवारी एस. पी. कॉलेज ग्राउंडवर होणार आहेत. आतापर्यंत सर्व संघांचे दोन सामने झाले आहे. त्यामुळे त्यांना संघाचे स्वरुप आणि स्पर्धेतील स्थितीचा अंदाज आला आहे. या आठवड्यातील कामगिरीला महत्त्व आहे, कारण त्यातून निर्णायक फेरीतील प्रवेश नक्की होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Society Cricket League Orange and purple cap winners