दत्ता नरसाळे ‘महापौर केसरी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव रासकर तृतीय आणि सोलापूरचा सुनील खताळ हे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. 

कुस्ती हा देशी खेळ असून तो इतर खेळांसारखाच रूजला आणि वाढला पाहिजे, अशी भूमिका महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केली. 

दत्ता नरसाळे ‘महापौर केसरी’ नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी #कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. #wrestling #dattanarsale #mayorkesari #mumbai #solapur #nagar #santoshgaikwad

A post shared by eSakal (@esakalphoto) on

क्रीडा परंपरा जतन करताना सर्व प्रकारच्या खेळांना व खेळाडूंना संधी देण्याची गरज आहे, असे मत आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केले. सोलापूरच्या दत्ता नरसाळे यांनी महापौर चषक राज्यस्तरीय स्पर्धा पटकावल्यानंतर एक लाखाचे पारितोषिक, चांदीची गदा व मानाचा पट्टा देण्यात आला. महापौर कुमार केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या विजय पाटीलने पुण्याच्या निखिल कदमवर मात करत २१ हजारांच्या पारितोषिकासह चांदीची गदा व मानाचा पट्टा मिळवला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Datta Narsale Mayor Kesari