आम्ही अजाणतेपणी ही चूक केली : सोनी टीव्ही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

बुधवारी झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा नामोल्लेख करण्यात आला. त्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागत आहोत. आम्ही केलेल्या चुकीचा आम्हाला पश्चाताप आहे. आमच्याकडून ही चूक अनावधानाने झाली.

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्या दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा  सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. आज अखेर सोनी वाहिनीने या चुकीबद्दल माफी मागितली आहे. आमच्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सोनी टीव्हीची माफी 

''बुधवारी झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा नामोल्लेख करण्यात आला. त्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागत आहोत. आम्ही केलेल्या चुकीचा आम्हाला पश्चाताप आहे. आमच्याकडून ही चूक अनावधानाने झाली. यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांची माफी मागतो,'' असे दिलगिरी व्यक्त करणारे ट्विट त्यांनी केले आहे. मात्र, याचवेळी या ट्विटसह त्यांनी वेगळाच व्हिडिओ वापरला आहे. 

Image may contain: 1 person, text

#Boycott_KBC_SonyTv महाराजांचा एकेरी उल्लेख; सोनीविरुद्ध रस्त्यावर उतरत निदर्शने

सोनी वाहिनीने केलेल्या या चुकीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. तसेच ट्विटवर #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅगही प्रचंड ट्रेंड झाला होता. आता या प्रकरणात वाहिनीने झुकतं माप घेत जनतेची माफी मागितली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sony Tv apologizes for disrespecting Shivaji Maharaj in Kaun Banega Karodpati on twitter