INDvsWI : खेळाडूंच्या पुढंपुढं करणं बंद करा; दादाने निवड समितीला सुनावले

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी झालेल्या निवडीवर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली भलताच भडकला आहे. सगळ्यांच खेळाडूंना खुश करणं आधी थांबवा अशा शब्दांत त्याने निवड समितीला सुनावले आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी झालेल्या निवडीवर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली भलताच भडकला आहे. सगळ्यांच खेळाडूंना खुश करणं आधी थांबवा अशा शब्दांत त्याने निवड समितीला सुनावले आहे. 

गांगुलीने ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. 

''संघात तिन्ही प्रकार खेळतील असे बरेच खेळाडू आहेत. रहाणे आणि शुभमनला एकदिवसीय संघात स्थान मिळाल्याचे आश्चर्य वाटते. निवड समितीने तिन्ही संघात सारख्या खेळाडूंची निवड करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांची लय आणि आत्मविश्वास चांगला राहिल. तिन्ही संघात खूप कमी सारखे खेळाडू आहेत. सर्वोत्तम संघांत सर्व संघात तेच खेळाडू असतात. सगळ्याच खेळाडूंना खुश करत बसण्यात अर्थ नाही, देशासाठी काय सर्वोत्तम आहे त्याचाच विचार करावा,'' अशा शब्दांत त्याने निवड समितीला सुनावले आहे.  

भारतीय संघ कसोटीसाठी 
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव

भारतीय संघ वनडेसाठी 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

भारतीय संघ टी-20साठी 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly Bats For Same Players Across All 3 Formats