गांगुली गरजला; आता देवाने भारतीय क्रिकेटला वाचवावे

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

परस्परविरोधी हितसंबंधांमुळे (Conflict of Interest) बीसीसीआयने राहुल द्रविड याला नोटीस बजावल्यामुळे माजी कर्णधार सौरभ गांगुली संतप्त झाला आहे. द्रविड बंगळूरमधील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा प्रमुख आहे. त्याने अलिकडेच ही जबाबदारी स्विकारली आहे. तो इंडिया सिमेंट्स कंपनीमध्ये उपाध्यक्ष आहे.

नवी दिल्ली : परस्परविरोधी हितसंबंधांमुळे (Conflict of Interest) बीसीसीआयने राहुल द्रविड याला नोटीस बजावल्यामुळे माजी कर्णधार सौरभ गांगुली संतप्त झाला आहे. द्रविड बंगळूरमधील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा प्रमुख आहे. त्याने अलिकडेच ही जबाबदारी स्विकारली आहे. तो इंडिया सिमेंट्स कंपनीमध्ये उपाध्यक्ष आहे. या कंपनीकडे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जची मालकी आहे. ही दोन्ही पदे म्हणजे परस्परविरोधी हितसंबंध होय अशी तक्रार मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने अजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी केली आहे. त्यामुळे बीसीसीआयचे नितीमत्ता अधिकारी निवृत्त न्यायमुर्ती डी. के. जैन यांनी ही नोटीस बजावली आहे.

त्यामुळे दादाला संताप अनावर झाला आहे. एक ट्विट करून दादा गरजला आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटमधील नवी फॅशन...परस्परविरोधी हितसंबंध...चर्चेत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग...आता देवानेच वाचवाने भारतीय क्रिकेटला...बीसीसीआय नितीमत्ता अधिकाऱ्याने बजावली द्रविडला नोटीस

भज्जीही बरसला

दादाने मंगळवारनंतर मध्यरात्री 12 वाजून 43 मिनिटांनी हे ट्वीट केले. त्यानंतर सहा मिनिटांत त्याच्या संघातील ऑफस्पीनर हरभजन सिंग याने ट्वीट करीत त्याला पाठिंबा दिला. अशा नोटीसांमुळे क्रिकेटमधील दिग्गजांचा अपमान होत आहे, असे त्याने संतप्त स्वरात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly lashes out on COA for sending notice to Rahul Dravid