Sourav Ganguly Rohit Sharma Captaincy : गांगुली रोहितच्या कॅप्टन्सीवर नाराज; रोहित ऐवजी मी कर्णधार असतो तर... | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly Rohit Sharma Captaincy

Sourav Ganguly Rohit Sharma Captaincy : गांगुली रोहितच्या कॅप्टन्सीवर नाराज; रोहित ऐवजी मी कर्णधार असतो तर...

Sourav Ganguly Rohit Sharma Captaincy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर सुरू असलेल्या WTC Final सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरण आणि हिरवी गार खेळपट्टी पाहून रोहितचा हा निर्णय योग्य वाटत असला तरी एका तासात चित्र पालटले. कांगारूंच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरूवात केली अन् रोहितचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला तर नाही ना अशी शंका मनात उपस्थितीत झाली.

कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील रोहित शर्माने पहिल्या दिवशी केलेल्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केले. त्याने भारताचा कसोटीमधील सर्वोत्तम गोलंदाज अश्विनला या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय योग्य वाटला नसल्याचे सांगितले.

सौरव गांगुली म्हणाला की, सामन्याचा निकाल काय होईल याचा विचार मी आताच करणे यावर विश्वास ठवत नाही. तुम्ही नाणेफेकीपूर्वी निर्णय घेता की तुमची प्लेईंग 11 काय असेल. भारताने चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. सांगण्यात येत आहे की गेल्या काही वर्षात भारताला 4 वेगवान गोलंदाज खेळवण्याने फायदा झाला आहे. मात्र जर मी कर्णधार असतो तर मला अश्विन सारख्या दर्जेदार फिरकीपटूला संघाबाहेर ठेवणे खूप कठिण गेले असते.'

ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच फलंदाज हे डावखुरे आहेत. त्यामुळे ऑफ स्पिनर अश्विला संघात स्थान देण्यात यावे असे मत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी नोंदवले. रोहितने ट्रॅविस हेडने आल्या आल्या आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केल्यानंतर फिल्डिंग सीमारेषेवर नेली. यावरही गांगुली नाराज होता. त्याने हेडविरूद्ध लगेचच बचावात्मक रणनिती अवलंबने योग्य नसल्याचे मत नोंदवले.

(Sports Latest News)