
ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अगणित नुकसान झाले. यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी बुशफायर चॅरिटी क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यांची जोडी क्रिकेटविश्वातील नावाजल्या गेलेल्या जोड्यांपैकी एक. त्यांच्या मैत्रीचे खूप किस्सेही अनेकजण सांगत असतात. आताही एका पोस्टमुळे सचिन-सौरव चर्चेत आले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्याचं झालं असं की, सचिन गेल्या आठवड्यात एका चॅरिटी मॅचसाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. या मॅचनंतर तो सध्या तेथे सुट्टी एन्जॉय करत आहे. आज त्याने मेलबर्न येथील आपला एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्यानंतर त्यावर सौरव दादाने एक मजेशीर कमेंट केली आहे. पण या कमेंटद्वारे त्याने आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली आहे.
- 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी हाच सर्वोत्तम भारतीय कर्णधार!
सचिनने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ''ऑस्ट्रेलियातील उन्हात बसण्याची मजा घेत आहे,'' सचिनला सुटी एन्जॉय करताना पाहिल्यावर त्यावर व्यक्त होणं दादाला राहवलं नाही. त्यामुळे दादानेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दादा म्हणाला, 'किसी किसी का किस्मत अच्छा है, छुट्टी मनाते रहो'! (काहीजण खूप नशीबवान असतात, सुट्टीचा आनंद लुटा.)
सचिन आणि दादाचे हे मित्रप्रेम सध्या सोशल मीडियावर हॉट टॉपिक बनत चालले आहे. दोघांच्या चाहत्यांनी यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
- क्रिकेट कमेंटेटर म्हणतो 'हिंदी आलीच पाहिजे!'; चाहत्यांमध्ये वाद उफाळला
सध्या सौरव गांगुलीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) जबाबदारी आहे. तो बीसीसीआयचा अध्यक्ष असून तो उत्तम पद्धतीने याचा गाडा हाकत आहे. मात्र, सचिनवर सध्या अशी कोणतीच मुख्य जबाबदारी नसल्यामुळे दादाच्या मानाने त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. तरीही, सचिन क्रिकेटशी निगडीत जगभरातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतो.
- नेहराकडून बुमराची पाठराखण, तर झहीरने दिला 'हा' सल्ला!
ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अगणित नुकसान झाले. यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी बुशफायर चॅरिटी क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आली होती. पाँटिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन या दोन टीममध्ये ही चॅरिटी मॅच पार पडली. यामध्ये वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा, टीम इंडियाचा माजी डावखुरा तडाखेबंद बॅट्समन युवराज सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी खेळाडू सहभागी झाले होते.