दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजाला कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

South Africa Team

दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजाला कोरोना

दक्षिण अफ्रिका संघातील जलदगती गोलंदाज लुंगी एनिग्डीला कोरोनाची लागण झाली आहे. नँदरलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून माघार घेण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

क्रिकेट दक्षिण अफ्रिकेनं (CSA) ने एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. जलदगती गोलंदाज एनिग्डीच्या जागी ज्यूनियर डाला याचे नाव संघात समाविष्ट करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 'लुंगी एनिग्डीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी त्याला या दौऱ्याला मुकावे लागणार आहे.

हेही वाचा: भुवी झाला 'बाप' माणूस; नुपूरनं लेकीला दिला जन्म

त्याची प्रकृती स्थिर असून आम्ही कोरोना प्रॉटोकॉलचे पालन करत आहोत. लुंगी एनिग्डी जुलैमध्ये आयरलँड विरुद्धच्या मालिकेत खेळला होता. तेव्हापासून तो संघाच्या बाहेर होता. घरच्या मैदानात नँदरलँड विरुद्धच्या वनडे मालिकेतून तो पुन्ह कमबॅक करणार होता. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाचा भाग होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती.

हेही वाचा: IND vs NZ: सूर्यकुमार की श्रेयस.. चौथ्या नंबरवर कोणाला बॅटिंग?

दक्षिण आफ्रिका आणि नँदरलँड यांच्यातील वनडे सामने सेंच्युरियनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. पहिला वनडे सामना 28 नोव्हेबरला नियोजित असून 1 डिसेंबरला होणाऱ्या तिसऱ्या सामन्याने वनडे मालिकेची सांगता होईल. नँदरलँडचा संघ पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. कोरोनातून जग जवळपास सावरले आहे. पण तरीही अजून धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळेच योग्य ती खबरदारी घेत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

loading image
go to top