esakal | SAvENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडला हरवत आफ्रिकेने संपविला विजयाचा दुष्काळ!
sakal

बोलून बातमी शोधा

SA-ENG

- आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्वाधिक 95 धावा केलेला यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉक सामनावीर ठरला.

SAvENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडला हरवत आफ्रिकेने संपविला विजयाचा दुष्काळ!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला चौथ्याच दिवशी 107 धावांनी पराभूत केले. ग्रॅमी स्मिथ, मार्क बाऊचर, जॅक्‌ कॅलिस अशा आधीच्या पिढीतील दिग्गजांकडे मार्गदर्शन-संघटनाची धुरा आल्यानंतर आफ्रिकेने विजय मिळविणे चाहत्यांसाठी आनंददायक ठरले. मागील सलग पाच कसोटी हरल्यानंतर त्यांना प्रथमच विजय मिळाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

376 धावांच्या आव्हानासमोर 1 बाद 121 वरून इंग्लंडचा दुसरा डाव 268 धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने सर्वाधिक चार विकेट टिपल्या. 

उपाहाराला इंग्लंडने 3 बाद 171 अशी वाटचाल केली होती; पण दुसऱ्या सत्रात रूट, स्टोक्‍स, बेअरस्टॉ, बटलर हे मोहरे गारद झाले. 

- FlashBack 2019 : क्रिकेटमध्ये दांडी; इतर खेळांमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी!

आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्वाधिक 95 धावा केलेला यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉक सामनावीर ठरला. चार कसोटींच्या मालिकेतील दुसरी लढत तीन जानेवारीपासून केपटाऊनला होईल. 

संक्षिप्त धावफलक :

दक्षिण आफ्रिका : 284 व 272 विजयी विरुद्ध इंग्लंड 181 व 93 षटकांत सर्वबाद 268 (रॉरी बर्न्स 84-154 चेंडू, 11 चौकार, ज्यो रूट 48, बेन स्टोक्‍स 14, जॉनी बेअरस्टॉ 9, जॉस बटलर 22, कागिसो रबाडा 103-4, एन्रीक नॉर्कीए 56-3, केशव महाराज 37-2) 

- Video : दानिश कनेरिया प्रकरणी शोएब अख्तरने घेतला यू-टर्न!

आम्हाला या विजयाची नितांत गरज होती. ही सुरुवात आहे. कसोटी संघ म्हणून आपली प्रगती व्हायला हवी यासाठी आम्हाला भरीव प्रयत्न करायचे आहेत. ही वाटचाल प्रदीर्घ असेल, याची आम्हाला जाणीव आहे. 
- फाफ डू प्लेसी, आफ्रिका कर्णधार 

- AUSvNZ : 'बॉक्‍सिंग डे' कसोटीत किवीजना हरवत कांगारूंनी मालिकाही जिंकली!